एकनाथ खडसेंचा भाजपला दणका, 60 भाजप पदाधिकाय्रांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

एकनाथ खडसेंचा भाजपला दणका, 60 भाजप पदाधिकाय्रांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

जळगाव – काही दिवसांपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता खडसे यांनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. जळगावमध्ये भाजपला पहिला हादरा बसला असून जिल्ह्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं इन्कमिंग सुरू झालं असून भाजपला मात्र चांगलीच गळती सुरु झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या  मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला आधीच मोठा धक्का बसला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला आणखी मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS