मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी ट्वीट करुन खुलासा केला असून मी भाजपमध्येच राहणार असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या फेक अकाऊंटवरुन व अन्य काही अकाऊंटमधून ” मी 21 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार” अशा आशयाची पोस्ट आज सर्वत्र व्हायरल झाली आहे. सदर बातमी खोटी असून, मी भाजपमध्येच राहणार असल्याचं खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सदर बातमी खोटी असून, मी भाजपा मध्येच राहणार आहे. मी भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही.वारंवार विविध माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबधित अकाऊंट ची चौकशी करुन, सदरील व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविणार आहे. https://t.co/jJwuPsZcj1
— Eknath Khadse (@EknathKhadseBJP) April 2, 2018
दरम्यान मी भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच वारंवार विविध माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबधित अकाऊंटची चौकशी करुन, सदरील व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे ते भाजपमध्ये राहणार असल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झुकून नमस्कार केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार अफवा पसरवण्यात आली होती. याबाबत राजकीय वर्तुळातही मोठं वादळ निर्माण झालं होतं. परंतु खडसे यांनी केलेल्या या स्पष्टीकरणामुळे सध्या तरी हे वादळ शमलं असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS