शिवसेनेच्या बोच-या टीकेवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया !

शिवसेनेच्या बोच-या टीकेवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयातून केलेल्या बोच-या टीकेवर एकनाथ खडसे यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं केलेल्या टीकेला आपण फार महत्त्व देत नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बुधवारी सामना संपादकीयातून एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली होती. भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसेंना इतर पक्षातून येत असलेल्या ऑफरवर टीका करताना पदर ढळला तर अशा ऑफर येत असतात अशी टीका खडसेंवर करण्यात आली होती. त्यानंतर आपण या टीकेला फार महत्त्व देत नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS