‘ती’ दोन वर्ष अस्वस्थतेची होती – एकनाथ खडसे

‘ती’ दोन वर्ष अस्वस्थतेची होती – एकनाथ खडसे

मुंबई  भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे.  या प्रकरणात एकनाथ खडसे यांना पुणे एसीबीनं क्लीन चिट दिली आहे. त्यानंतर खडसेंनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा मिळाल्याने आनंद वाटला. दोन वर्षात कृतघ्न माणसं पाहिली पण कृतज्ञ माणसांची संख्या जास्त असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप झाले. पण चौकशीतून सत्य समोर आलं आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते तोंडघशी पडले असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी  दोन वर्ष अस्वस्थतेची होती. माझी टिंगल-टवाळी, मानहानी करण्यात आली. परंतु मी असं कोणतंही कृत्य केलं नाही, यावर माझा विश्वास होता. तसेच माझ्या जवळच्या माणसांनी किती गद्दारी केली हा आता बोलण्यासारखा विषय नाही. तसेच बातमी समजल्यानंतर मला आनंद वाटला. 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता. पण आता हेतूपुरस्सर माझ्यावर आरोप झाले. पण चौकशीतून सत्य समोर आलं. आरोपात तथ्य नाही. मी निर्दोष आहे. ह्याचा मला आनंद आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते तोंडघशी पडले असल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे.

COMMENTS