अमित देशमुख यांना मनोहर जोशींकडून शिवसेनेत येण्याची ऑफर !

अमित देशमुख यांना मनोहर जोशींकडून शिवसेनेत येण्याची ऑफर !

मुंबई – काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिली आहे. पुणे महापालिकेत आयोजित कऱण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना मनोहर जोशी यांनी ही ऑफर दिली आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलमध्ये स्व. विलासराव देशमुख थ्रीडी तारांगणाचे उद्घाटन मनोहर जोशी आणि अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अमित देशमुख यांनी भाषण केले. त्यानंतर अमित देशमुख यांचा आवाज ऐकून शिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यासारखे वाटत असल्याचं मनोहर जोशी यांनी यांनी म्हटलं. तसेच तुमचे इकडे काही जमले नाही, तर शिवसेनेत या अशी ऑफरही जोशी यांनी अमित देशमुख यांना दिली आहे.

दरम्यान मनोहर जोशी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली असून तर्कवितर्क लढविले जात आहेत.  माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिवसेना पक्षाने अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. मला कधीच तिकीट मागण्यासाठी खटाटोप करावा लागलं नाही. प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम मी केले. त्या निमित्ताने राज्यातील अनेक भागात जाण्याची संधी मिळाली. मात्र आज पुण्यातील कार्यक्रमाला येऊन एक वेगळे समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले.

 

COMMENTS