ठाणे – टोलनाक्यावरील गर्दी ही सामान्य नागरिकासाठी काही नवीन नाही. दररोज अनेक ठिकाणी वाहनचालकांना या ट्रॅफिकमध्ये तासनतास ताठकळत बसण्याची वेळ येते. परंतु शुक्रवारी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाच या ट्रॅफिकचा अनुभव आला. ठाण्यावरुन मुंबईच्या दिशेनं जात असताना एकनाथ शिंदे यांना मलुंड येथील आनंदनगर टोलनाका लागला. या टोलवर प्रचंड मोठी वाहनांची रांग लागली होती. ही रांग पिवळ्या पट्टीच्या बाहेर गेली तरी टोल प्रशासनाकडून टोल वसुली सुरु होती. याच गर्दीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडकला होता.
दरम्यान काही वेळ गेल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी गाडीच्या खाली उतरुन टोल प्रशासानाला खडे बोल सुनावले. तसेच सर्व वाहानांना टोल न भरताच सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर काही वेळातच टोलवरील ही गर्दी कमी झाली. टोलवरील गर्दी संपेपर्यंत एकनाथ शिंदे त्याच ठिकाणी उभे होते. वाहनांची गर्दी पिवळ्या पट्टी बाहेर गेली तर वाहने टोल न भरताच सोडून देण्याचा आदेश मंत्री महोदयांनी दिला आहे. परंतु मंत्र्यांच्या आदेशाची कशी पायमल्ली केली जाते याचा अनुभव सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना आला आहे.
COMMENTS