मुंबई – ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून सरकारी जागेवरील सर्व अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जानेवारी किंवा त्याअगोदरची सर्व बांधकामे नियमित केली जाणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गायरान, गावठाणे, सरकारी उकिरडे, खळवाढीच्या सरकारी जागांवरची सर्व बांधकामं नियममित केली जाणार असल्यामुळे मागासवर्गीय वस्त्या नियमित होती, तसेच अल्प पैसे भरुन सर्वव बांधकामे नियमित केली जाणार आहेत.
दरम्यान आदर्श प्रकरणानंतर 2013 साली सरकारी जागेवरची सर्व अतिक्रमणं नियमित न करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. परंतु तो आता बदलण्यात आला असून 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
COMMENTS