मुंबईत वाजपेयींचे अस्थी कलश, भाजप नेत्यांनी घेतलं दर्शन ! VIDEO

मुंबईत वाजपेयींचे अस्थी कलश, भाजप नेत्यांनी घेतलं दर्शन ! VIDEO

मुंबई – मुंबईमध्ये आज माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश आणण्यात आला. दिल्ली येथून विमानाने मुंबई येथे अटलजींचा अस्थी कलश आणण्यात आले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशांना वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, बंदरविकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार अमर साबळे व आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

COMMENTS