मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी झाली लष्करात अधिकारी !

मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी झाली लष्करात अधिकारी !

नवी दिल्ली –  एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीनं मोठ्या पगाराची नोकरी सोडून लष्करात रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर ती लष्करात रुजू देखील झाली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी डॉ. श्रेयशी पोखरियाल हिनं हा धाडसी निर्णय घेतला आहे. श्रेयशी कुटुंबियांच्या उपस्थितीत कॅप्टन म्हणून भारतीय लष्कराच्या वैद्यकीय विभागात सामील झाली आहे. श्रेयशीच्या गणवेशावर स्टार लावतानाचा फोटो ट्विट करून स्वतः पोखरियाल यांनी याबबात माहिती दिली असून ती रुडकी येथील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार असल्याची माहिती स्वतः पोखरियाल यांनी दिली आहे.

 मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली

श्रेयशीने जॉलीग्रांट (ऋषिकेश) येथून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय मॉरिशस येथे ती गेली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रेयशीला मॉरीशस येथे मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली होती, परंतु  तिने ती धुडकावून लावत भारतीय सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

 

 

मुलीचा अभिमान वाटतो – पोखरियाल

मुलीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया पोखरियाल यांनी दिली आहे. आमच्या कुटुंबियातून माझी मुलगी पहिली सैन्य अधिकारी बनल्याचा गर्व असून कुटुंबातून कोणीतरी सैन्यात असावं अशी माझी इच्छा होती, आज मुलीने ती पूर्ण केली. श्रेयशीला लहानपणापासून डॉक्टर बनायचं होतं पण दोन वर्षांपूर्वी तिने लष्करात जाण्याचं ठरवलं. माझी मुलगी आता देशसेवा करेल याचा मनापासून आनंद असल्याचं माजी मुख्यमंत्री पोखरियाला यांनी म्हटलं आहे. तसेच आपण वडिलांची गाणी गुणगुणत मोठी झाली असून ती गाणी ऐकूनच देशसेवेसाठी प्रेरित झाल्याचं श्रेयशीनं म्हटलं आहे.

 

 

 

COMMENTS