इडा पिडा टळू दे, बळीराज्य येऊ दे, अजितदादांचे अंबाबाईला साकडे !

इडा पिडा टळू दे, बळीराज्य येऊ दे, अजितदादांचे अंबाबाईला साकडे !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून या आंदोलनाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजी कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे. यावेळी अजित पवार,  सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून अजितदादांनी राज्यात इडा पिडा टळू आणि बळीराज्य येऊ दे असं साकडं अंबाबाईला घातलं आहे. तसेच सरकार उपस्थित केलेल्या मुद्द्याला बगल देत असून ही जनता काही दुधखुळी नसल्याचंही अजिदादांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. कोल्हापूर ते पुणे असा हा मोर्चा निघणार आहे. 2 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची पहिली सभा कोल्हापूरच्या मुरगड येथून होणार आहे. त्यानंतर जयसिंगपूर, आटपाडी, जत, मिरज, शिराळा, सांगली, महूद, सोलापूर, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, दहिवडी, कोरेगाव, सातारा, पाटण, शिरूर, जुन्नर, भोसरी, खेड, मावळ, पुरंदर, दौंड आदी ठिकाणी आंदोलनाच्या सभा होणार आहेत. हे आंदोलन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून यावेळी, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS