भाजप घटक पक्षाचा नेता राष्ट्रवादीत

भाजप घटक पक्षाचा नेता राष्ट्रवादीत

कोल्हापूर – भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाचे नेते व माजी आमदार राजीव आवळे आज मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची कोल्हापूरमधील ताकद वाढणार आहे. त्यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांचादेखील प्रवेश होणार आहे.

वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे.नगराध्यपदावर असताना आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या बालेकिल्ल्याला लावला होता.

राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. मात्र काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी आवळे यांचा पराभव केला. दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.

COMMENTS