मुंबई : शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन झालंय. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात.
हृद्य विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. त्यांनी आपली राजकीय कारकिर्द अखिल भारतीय विद्यार्थी सेनेतून केली. ते पहिल्यांदा सन १९९१ लोकसभेत निवडून आले. त्यानंतर ते सलग २००४ पर्यंत दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली…
मोहन रावले गेले.
कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते.
"परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला
विनम्र श्रद्धांजली… pic.twitter.com/cnVZzzmIKO— Sanjay Raut (@rautsanjay61) December 19, 2020
COMMENTS