अकोला – माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाला अखेर यश आलं आहे. चार दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर शेतक-यांच्या सातही मागण्या सरकारने माान्य केल्या आहेत. शेतक-यांच्या रास्त आणि अवाजवी नसलेल्या मागण्या होत्या. तरीही सरकारने सुरूवातील ताठरपणाची भूमिका घेतली होती. आंदोलकांबरोबर चर्चाही करायला नकार दिला होता.
मात्र देशभरातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत गेला आणि दिवसेंदिवस तो वाढत गेला. शिवसेना, प्रकाश आंबेडकर, शरद पवार, राजु शेट्टी, बच्चू कडू, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यास अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे अखेर सरकारला जाग आली आणि शेतक-यांच्या मागण्या सरकारने अखेर मान्य केला. या माण्यांमुळे राज्यातील शेतक-यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
COMMENTS