मनसेच्या आठही जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

मनसेच्या आठही जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

मुंबई – काँग्रेस कार्यालयावरील हल्ला प्रकरणात अटक केलेल्या मनसेच्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे. याप्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना 18 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. त्यानंतर या आठही कार्यकर्त्यांनी न्यायालकडे जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली असून या आठही कार्यकर्त्यांचा जामीनअर्ज न्यायालयानं फेटाळला आहे.

या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष सरोदे, संतोष धुरी, दिवाकर पडवळ, अभय मालप, हरिश सोळंकी, योगेश चिले आणि विशाल कोकणे यांना 4 डिसेंबररोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आला असल्याचं कारण देत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे..

1 डिसेंबररोजी सीएसटी जवळील काँग्रेसच्या आझाद मैदानाजवळील कार्यालयात घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली होती. तशा आशयाचे ट्विटही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक केली. फेरीवाल्यांवरुन काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरु झाल्यावर ही तोडफोड झाली होती. दरम्यान ही तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडल्याचं दिसतंय.

COMMENTS