भाजपच्या पदाधिका-यांनो सावध राहा, भीमा कोरेगावसारख्या आणखी घटना घडतील -मुख्यमंत्री

भाजपच्या पदाधिका-यांनो सावध राहा, भीमा कोरेगावसारख्या आणखी घटना घडतील -मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. भीमा कोरेगाव येथील घटना हे एक कारस्थान असून राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी अशी कारस्थाने रचली जात आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सावध राहाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकारिणीची बैठकीत या सूचना केल्या आहेत.

 

दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर भीमा कोरेगावसारख्या घटनांद्वारे राज्यातील वातावरण बिघडवण्याचे आणखी प्रकार घडतील. तशा घटना यापुढेही घडवून आणल्या जातील. त्यातून पक्षाची व सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी काम करून लोकांमध्ये पक्षाचे काम पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

 

COMMENTS