अकोला – शेतकरी मंचातर्फे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आंदोलकांशी चर्चा न करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे आंदोलन आता चांगलेच चिघळण्याची चिन्हे आहेत. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका यशवंत सिन्हा यांनी घेतली आहे.
देशातली वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी , दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे आंदोलनाला दिला पाठिंबा दिला आहे. तर राजू शेट्टी यांनी दिल्लीत देशभरातील महत्वाच्या शेतकरी नेत्यांन सोबत बैठक करुन आंदोलनाला पाठिंबा वाढवण्यासाठी लॉबिंग करत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आज आंदोलकांची भेट घेणार आहेत.
COMMENTS