शेतक-यांच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या मान्य – गिरीश महाजन

शेतक-यांच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या मान्य – गिरीश महाजन

मुंबई – शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक पार पडली आहे. या बैठकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या मान्य झाल्या असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारनं याबाबत लेखी आश्वासन दिलं असल्याची माहिती आहे.त्यामुळे शेतकरी हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.तसेच शेतक-यांना परत जाण्यासाठी रेल्वेच्या स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान जुन्या शिधापत्रिका तीन महिन्याच्या आत बदलून देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं असून वन जमिनीबाबत येत्या ६ महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं शासनानं म्हटलं आहे. त्यामुळे शासनाच्या या आश्वासनानंतर शेतक-यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

 

COMMENTS