नवी दिल्ली- मी मुस्लिम आहे परंतु मला प्रभू रामांबद्दल खूप जिव्हाळा आहे, असं वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे. रामाबद्दल मला एवढा का जिव्हाळा आहे हे मला माहित नाही परंतु मी त्यांना खूप मानतो असं ते म्हणाले आहेत.एवढच नाही तर मी रामाच्या नावाचं भजनंही म्हणतो असंही त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटलं आहे.
दरम्यान मी रामाला मानत असल्यामुळे मुस्लीम लोक मला हिंदू समजतात आणि हिंदू लोक मला मुसलमान समजतात असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काश्मीरमधील समस्येवरही आपली मतं मांडली आहेत. जम्मू-काश्मीरच्या समस्येवर तोडगा नक्की निघेल. परंतु कधी निघेल ? याचं उत्तर माझ्याकडे नाही. भारत पाकअधिकृत काश्मीरला पाकिस्तानपासून परत घेऊ शकत नाही. भारत व पाकिस्तान या दोन्हीही देशात संभाषण न होता शांतता प्रस्थापित करणं कठीण आहे तसेच भारत व पाकिस्तानमध्ये योग्य संभाषण होत नाही तोपर्यंत घुसखोरी बंद होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS