आम्ही आता सहज गोंजारतोय, उद्या स्वबळावर सत्ता मिळवू, गिरीष महाजनांचा शिवसेनेला टोला !

आम्ही आता सहज गोंजारतोय, उद्या स्वबळावर सत्ता मिळवू, गिरीष महाजनांचा शिवसेनेला टोला !

जळगाव – आम्ही आता मित्रपक्षाला सहज गोंजारत आहोत मात्र आगामी निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणार असल्याचा विश्वास जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला आहे. राज्यात आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत, हे मित्र पक्षाने समजून घेतले पाहीजे असा टोलाही त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला आहे. ते जळगावातील भाजपच्या एका कार्यक्रमात बोलत होत.

दरम्यान ६ एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खान्देश विभाग संघटन विस्तार पर्व या विभागीय नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकीत दोन जागा विरोधकांनी मिळवल्या तेवढ्यात विरोधकांची गत ‘उंदरांना चिंधीचा आधार’ अशी झाली असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच सुरात सुर मिळवून शिवसेना देखील आम्हाला डरकाळी दाखवत आहे, परंतु आम्हाला आगामी निवडणुकीत युतीची गरज भासणार नाही, आम्ही राज्यात स्वबळावर सत्ता करु असा दावा गिरीष महाजन यांनी यावेळी केला आहे.

COMMENTS