लोकसभा निवडणूक, पाचव्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती टक्के मतदान ?

लोकसभा निवडणूक, पाचव्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती टक्के मतदान ?

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली. देशातील 7 राज्यात 51 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं आहे. . ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. सायंकाळी पाचपर्यंतच्या आकडेवारीनुसार प. बंगालमध्ये मोठ्याप्रमाणात मतदान झाले आहे.

पाच वाजेपर्यंत झालेले मतदान –

बिहार – 52.86 टक्के

जम्मू-कश्मीर – 17.07 टक्के

मध्य प्रदेश – 61.93 टक्के

राजस्थान – 59.12 टक्के

उत्तर प्रदेश – 52.97 टक्के

प. बंगाल – 73.70 टक्के

झारखंड – 61.27 टक्के

COMMENTS