माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण … – संजय राऊत

माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण … – संजय राऊत

मुंबई – खासदार चंद्रकांत खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे. त्यांनी केलेला दानवेंबद्दलचा आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत ते जर खरं ठरलं तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटं बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच बुरखाबंदीवरील अग्रेलाखाबाबतही राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण आमच्यात काहीही मतभेद नाहीत. तुम्ही काहीही मनात आणू नका, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकच आहेत असही  स्पष्टीकरण राऊत.यांनी दिलं आहे.

COMMENTS