मनसेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणेंवर गुन्हा दाखल !

मनसेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणेंवर गुन्हा दाखल !

पुणे   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शंकर भवारी यांनी माहिती दिली असून रेशनींगच्या पकडलेल्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी सोनवणे पोलीसांवर दबाव आणत होते. तसेच पोलिसांनी कार्यकर्त्यावर कारवाई केल्यामुळे सोनवणे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या एपीआय ज्योती डमाळे यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिवीगाळ केली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याबाबत पोलिसांनी कलम 156/18,353,509,186,294 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याची बेकायदशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करणारी गाडी पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शरद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यावर कारवाई केल्याबाबत पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांना पोलिस स्टेशनला जमलेल्या ४० ते ५० लोकांसमोर व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमोर अर्वाच्य भाषेत अपमानीत केले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सोनवणे यांच्या अडचणीत वाता मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS