अर्थमंत्री अरुण जेटलींना रुग्णालयात केलं दाखल !

अर्थमंत्री अरुण जेटलींना रुग्णालयात केलं दाखल !

नवी दिल्ली  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. जेटली यांच्यावर आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेटली यांना गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत आहे. याबाबत गुरुवारी ट्विट करुन आपण मूत्रपिंड विकारानं त्रस्त असल्याचं जेटली यांनी स्वतः सांगितलं होतं.

दरम्यान जेटली यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. आज त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया केली जाणार आहे. मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तसेच जेटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीत वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

 

COMMENTS