चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादवांना १४ वर्षांची शिक्षा !

चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादवांना १४ वर्षांची शिक्षा !

पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा चांगलाच भोवला असल्याचं दिसत आहे. चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या कलमांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली असून ती एकाचवेळी भोगावी लागणार असल्यानं प्रत्यक्षात ही शिक्षा ७ वर्षांची असणार आहे. दमुका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. सध्या लालूंवर रिम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना आधीच दोषी ठरविण्यात आलं असून शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील चौथा आरोप झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा होता. त्यावरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळं त्यावरील निर्णय रखडला होता. अखेर १९ मार्च रोजी त्यावर सुनावणी होऊन लालूंना दोषी ठरवण्यात आलं होतं.  आज या प्रकरणी शिक्षेची सुनावणी झाली. यावेळी लालूंना दोन वेगवेगळ्या कलमांखाली ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली. म्हणजेच, त्यांना १४ वर्षांसाठी तुरुंगात राहावं लागणार आहे

 

 

 

COMMENTS