रांची – आरजेडीचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना काही दिवसांपूर्वीच कोर्टानं चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज रांची न्यायालयानं शिक्षा ठोठावली असून साडे तीन वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रांची न्यायालयात शनिवारी लालूप्रसाद यादव यांच्याबाबत सुनावणी यादरम्यान त्यांना ही शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे चारा घोटाळा लालू प्रसाद यादव यांना महागात पडला असल्याचं दिसत आहे.
दोषी ठरवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. गुरुवारी सकाळी लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र, त्यांना सुनावण्यात येणारी शिक्षा टळली आणि त्यांची पुन्हा रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह 15 दोषींना शिक्षा सुनावली गेली आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाने रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका केली असून, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती.
COMMENTS