बेळगाव – कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्या हस्ते व्हीटीयू विद्यापीठ परिसरातील एका उद्यानाचे उद्घाटन होणार होते मात्र हा उद्घाटनाचा कार्यक्रम मंत्रीमहोदयांच्या चांगलाच लक्षात राहिल. कारण उद्घाटन समारंभ पार पडण्याआधीच वनमंत्र्यांवर आणि उपस्थित नागरिकांवर मधमाश्यांनी कडाडून हल्ला केला. या हल्ल्यात वनमंत्री रामनाथ राय आणि खा. सुरेश अंगडी यांच्यासह 10-15 जण जखमी झाले.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वनमंत्री येत असलेल्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली होती. पण ड्रोनच्या आवाजाने तिथे असलेल्या मधमाश्या बिथरल्या आणि पोळ सोडून पळू लागल्या.मधमाश्यांनी थेट त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांवर,विद्यार्थ्यांवर हल्ला केला.वनमंत्री तरी यातून कसे वाचणार ?त्यांच्यावर देखील हल्ला केल्यानंतर मंत्रीमहोदयांची तारांबळ उडाली त्यांनीही आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह आपल्या गाडीच्या दिशेने कूच केली आणि आल्या पावलांनी मंत्रीमहोदयांना माघारी फिरावे लागले. उद्घाटन सोहळा अर्धवटच राहिला.
COMMENTS