मुंबई – भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायमूर्ती एम जे चेल्लमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्य़क्त केलीय. हा विषय अत्यंत गंभीर आणि स्फोटक असून न्यायव्यवस्थेच्या विश्वासहर्तेला तडा गेला असल्याचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी केलं आहे.
दरम्यान माझ्या कारकिर्दीत असं पहिल्यांदाच घडलं असून न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घावी लागली याचा अर्थ मीडिया हा लोकशाहीचा सर्वोच्च स्तंभ झाला असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. न्यायमुर्तींमधला हा अंतर्गत वाद आहे, मात्र त्यामध्ये बाह्य घटक अंतर्भूत असण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. तरीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाचा फोडणे अयोग्य असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच या न्यायमूर्तींनी राजीनामा देऊन पत्रकार परिषद घ्यायला हवी होती तसेच सर्व न्यायाधिशांची सभा घेऊन ही वाद सोडवायला हवा होता. असंही सावंत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS