…म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं नाही लग्न !

…म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं नाही लग्न !

मुंबई :  माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचं राजकारणात मोठं योगदान आहे. त्यांची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. अटल बिहारी वाजपेयी हे मुळचे मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील असून त्यांचा जन्म त्याच ठिकाणी झाला आहे. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी शिक्षक होते. तसेच ते आपल्या संसदीय कारकीर्दीत लखनौमधूनच खासदार राहिले होते.

…म्हणून केलं नाही लग्न !

अटल बिहारी वाजपेयी यांचं देशासाठी योगदान मोठं आहे. आपलं संपूर्ण जीवन देशासाठी आणि खास करून राजकीय सेवेसाठी घालवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आयुष्यभर कार्य करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी  लग्न केलं नसल्याचं सांगितलं जातं. तर दसु-या बाजूला राजकुमारी कौल यांच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि त्यांच्यासोबतही कौल राहिल्या असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. परंतु अटल बिहारी वाजपेयींनी हे कधीच जाहीरपणे सांगितलं नसून ‘मी अविवाहित आहे, पण ब्रम्हचारी नाही’, असं ते म्हणाले होते.

अटल बिहारी वाजपेयी हे उत्कृष्ठ कवीसुद्धा आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रचंड गाजले आहेत. त्यापैकी ‘मेरी इक्यावन कविताएं’, मृत्यु या हत्या, अमर बलिदान, कैदी कविराय की कुण्डलियाँ, संसद में तीन दशक, अमर आग है, कुछ लेख: कुछ भाषण, सेक्युलर वाद, राजनीति की रपटीली राहें बिन्दु बिन्दु विचार ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.

COMMENTS