बाटी-चोखा कच्चा वोट, दारू-मुर्गा पक्का वोट, उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य!

बाटी-चोखा कच्चा वोट, दारू-मुर्गा पक्का वोट, उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य!

उत्तर प्रदेश – भारतीय समाज पक्षाच्या एका मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बाटी-चोखा कच्चा वोट, दारू-मुर्गा पक्का वोट असं वक्तव्य उत्तर प्रदेशमधील सहकारमंत्री आणि भासपचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी केलं आहे. गरीब हे दारू पितात, कोंबडी खातात आणि मतं देतात असं राजभर यांचं म्हणणं आहे.त्यांनी हे वक्तव्य बलरामपूर येथील एका कार्यक्रमात केलं आहे.

निवडणुकीच्या दरम्यान अनेक नेते मतांसाठी गरिबांना दारू, कोंबडं देऊन त्यांची मतं आपल्याकडे वळवतात, आणि निवडून आल्यानंतर दिल्ली, लखनऊमधील नेते त्यांना पाच वर्ष कोंबडा बनवून फिरवतात. त्यामुळे गरीब गरीब बनत चालले असून श्रीमंत हे श्रीमंत बनत चालले असल्याची टीका त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केली  आहे. यापूर्वही राजभर अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. काही महिन्यांपूर्वी राजभर यांनी भाजपवरच टीका केली होती. भाजप जेवढा एका महिन्यात खर्च करते तेवढा खर्च तर आमच्या समुदायातील लोक दिवसभराच्या दारुवर करतात. राजभर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

 

 

COMMENTS