पुणे – पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक गणेश बीडकर हे गोळी लागल्यामुळे जखमी झाले आहेत. पिस्तूल साफ करताना चूकून गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले असल्याची माहिती आहे. बीडकर यांच्या मांडीला गोळी लागली असून आज दुपारी साडे बारा वाजता ही घटना घडली आहे. सध्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
COMMENTS