मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु यापूर्वीच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असल्याची माहिती आहे. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं बापट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांचंही नाव असल्याची माहिती आहे. परंतु बापट यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे आता पुणे लोकसभेसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत यांना उमेदवारी?
नागपूर -नितीन गडकरी
चंद्रपूर – हंसराज अहीर
जालना – रावसाहेब दानवे
अकोला – संजय धोत्रे
भिवंडी – कपिल पाटील
गडचिरोली – अशोक नेते
पुणे -गिरीश बापट
COMMENTS