दरम्यान पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीवरुन हा वाद झाला असल्याची माहिती आहे. भाजप – शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी अमळनेर येथे येत असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांचा ताफा पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिका-यांनी रोखला होता. पाडळसरे धरण पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिका-यांनी केली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी पाडळसरे धरणासाठी अडीच हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी निघून गेले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
तसेच उदय वाघ हे स्मिता पाटील यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता पाटील यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे.
COMMENTS