गोवा – आजारी असतानाही मनोहर पर्रिकरांनी लावली सचिवालयात हजेरी !

गोवा – आजारी असतानाही मनोहर पर्रिकरांनी लावली सचिवालयात हजेरी !

गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आजारी असतानाही आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालयात हजेरी लावली आहे. आजारी असल्यामुळे गेली अनेक दिवसांपासून पर्रिकर यांना आपल्या कार्यलयात येता आले नव्हते. अजूनही ते आजारी असून उपचार सुरु असताना देखील त्यांनी कार्यालयात हजेरी लावली आहे.

सुमारे वर्षभरापासून पर्रिकर हे स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. या आजारावर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील लीलावती रुग्णालय त्यानंतर अमेरिकेत जाऊन उपचार घेतले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे. परंतु अद्याप प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना कार्यलयात येणे शक्य होत नाही. परंतु तरीही आज नवीन वर्षाचं त्यांनी सचिवालयात हजेरी लावली आहे.

COMMENTS