गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा !

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा !

नागपूर – गोंदिया – भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक घेऊ नये याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली असून याठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार असल्याचा निकाल कोर्टानं दिला आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भंडारा-गोंदिया या मतदारसंघातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाल्यास नवीन खासदाराला पुरेसा वेळ मिळेल, व जनतेला प्रतिनिधी शिवाय ठेवता येत नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी या रिक्त जागेवर कधी पोटनिवडणूक घेणार असा सवाल माजी खासदार आणि काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं. त्यानंतर आज कोर्टानं याठिकाणच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा केला असून रिक्त जागेवर लवकर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून कोणाला उमेदावारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS