शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही – भाजप आमदार

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही – भाजप आमदार

नवी दिल्ली – शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नसून नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत. तसेच त्याला वैयक्तिक कारणे असून शेतकरी काय आताच आत्महत्या करत आहेत का, त्यापूर्वीही होतच होत्या असं वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केलं आहे. आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान पत्रकारांनी त्यांना वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय करत आहे असा प्रश्न विचारला असता आमदार सावे यांनी हे वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आताच होत आहेत का, त्या पूर्वीही होतच होत्या. त्यावर पत्रकारांशी जीएसटीमुळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके महागल्याचे सांगताच आमदार सावे यांनी नोटाबंदी, जीएसटी या निर्णयामुळे सरकारची लोकप्रियता वाढली असल्याचही आमदार सावे यांनी म्हटलं आहे. सावे यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS