उद्धव ठाकरेंचा छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर !

उद्धव ठाकरेंचा छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  ‘सामना’ संपादकीयमधून छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर व्यक्त केला आहे. भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत व त्यांच्या सुटकेनं ओबीसींच्या थंड पडलेल्या चळवळीस बळ मिळेल  असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच भुजबळ ‘मेकअप’ करून कोणत्या मंचावर जातात ? ती उमेद त्यांच्यात उरली आहे का ? या प्रश्नांची उत्तरं भविष्यात मिळतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कालपर्यंत भुजबळांच्या सावलीला उभे न राहणारे लोक अचानक फटाके वाजवू लागले आहेत. एकमेकांना पेढे भरवू लागले आहेत. भुजबळ ‘कैदी’ म्हणून इस्पितळात असताना यापैकी किती जण त्यांच्या समाचाराला गेले, असे अनेक प्रश्न लोकांच्याही मनात असल्याचं उद्धव य़ांनी म्हटलं आहे.तसेच भुजबळ शिवसेनेशी आणि शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र् सदन उभाारण्यात घोटाळा झाला नसल्याचं सत्य तेव्हा फक्त ‘सामना’ने छापलं. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाहीत. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे. ते जामिनावर सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञास अधिक न सांगावे अशीही बोचरी टीका उद्धव यांनी लगावली आहे.

COMMENTS