राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींसाठी  27 मे रोजी होणार मतदान !

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी होणार मतदान !

मुंबई – राज्यातील विविध ग्रामंपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार असून या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 27 मे 2018 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहेत. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येणार असून  त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होणार आहे.

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक  

ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4, गडचिरोली- 2

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या

ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43, गडचिरोली (175)- 464.

या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS