शिवसेनेचा विरोध डावलून केंद्र सरकारचा नाणार प्रकल्पाला हिरवा कंदिल !

शिवसेनेचा विरोध डावलून केंद्र सरकारचा नाणार प्रकल्पाला हिरवा कंदिल !

नवी दिल्ली – शिवसेनेचा विरोध डावलून केंद्र सरकारनं अखेर रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर आज (बुधवार) नवी दिल्लीत सह्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील तसेच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असणार असल्याचं मत पेट्रलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकल्पाला रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांसह भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं केला होता. परंतु तरीही केंद्रानं या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवल्यामुळे शिवसेना आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS