‘GST’ मुळे मुंबईतील जकात नाके बंद

‘GST’ मुळे मुंबईतील जकात नाके बंद

आजपासून  देशात जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतील जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या प्रमुख नाक्यांसह सर्वच जाकात नाके बंद झाले आहेत.

या जकात नाक्यामुळे महापालिकांच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत होता. मात्र, आता जीएसटी लागू झाल्यानं महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वपूर्ण स्त्रोत बंद झाला आहे.

मध्यरात्रीपासून देशात एक देश एक कर लागू झाला. संसदेतील कार्यक्रमात मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिएसटी लाँच करण्यात आला. देश अर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली.

 

COMMENTS