‘या’ वस्तूंवरील जीएसटीत कपात, अरुण जेटलींची घोषणा !

‘या’ वस्तूंवरील जीएसटीत कपात, अरुण जेटलींची घोषणा !

नवी दिल्ली – जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.टीव्ही, संगणक, टायर, १०० रुपयांवरील सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली असून हा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २८ टक्के कर असलेल्या २८ च वस्तू त्या टॅक्स स्लॅबमध्ये उरल्या आहेत असेही अरूण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. सिमेंट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आली असून ऑटोमोबाइल सेक्टरमधल्या १३ वस्तूंवरचा कर हा २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर सिमेंटवरचा करही २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला असल्याचं जेटलींनी म्हटलं आहे.

एकूण ३३ वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले आहे. २६ वस्तूंवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के असा करण्यात आला आहे. तर बाकी सहा वस्तूंवरचा जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर करण्यात आला असल्याचंही यावेळी अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.

या वस्तूंची २८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर कपात

टायर

१०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट
बिलियर्ड्स आणि स्नूकर्स

लिथियम बॅटरी
३२ इंचापर्यंतचा टीव्ही

जीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू

थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स १८ टक्क्यांवरून १२ टक्के
धार्मिक यात्रांवरचा जीएसटी १८ वरून १२ टक्के

फूटवेअरवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के

गोठवलेल्या भाज्या ५ टक्क्यांवरून ० टक्के

दरम्यान ज्या वस्तूंवरचा कर २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्यात आला त्या वस्तूंवर १ जानेवारी २०१९ पासून १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल असेही जेटली यांनी म्हटले आहे.

COMMENTS