जीएसटीच्या करातील बदल गुजरात निवडणुकीमुळेच – शरद पवार

जीएसटीच्या करातील बदल गुजरात निवडणुकीमुळेच – शरद पवार

नाशिक – गुजरात निवडणुकीमुळेच जीएसटी मध्ये बदल केले आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज केले.  पवार नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी शरद पवार  म्हणाले की,  केंद्र सरकारने जीएसटीत केलेला फेरबदल गुजरात निवडणुकीच्या तोंडावर केलेली खेळी आहे. सरसकट सर्व वस्तुंच्या करसंरचनेत फेरबदल करावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 9 ते 10 जागांवर काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत त्रुटी आहे. काही शेतकऱ्यांना केवळ 120 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी. अन्यथा  25 नोव्हेंबर नंतर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल अशा इशारा पवार यांनी दिला.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीविषयी बोलताना पवार यांनी राजकीय भेट नसल्याचे म्हटले आहे. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे ही सूचना उध्दव यांना केल्याचे पवार म्हणाले.

COMMENTS