गुजरातमध्ये 49 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, भाजप नंबर ‘एक’ ला !

गुजरातमध्ये 49 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, भाजप नंबर ‘एक’ ला !

गांधीनगर (गुजरात) –  2012 च्या विधानसभा निवडणुकीत 158 पैकी 49 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यामध्ये 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहे.

नॅशनल इलेक्शन वॉचमधून निवृत्त झालेल्या मेजर जनरल अनिल वर्मा यांनी सांगितले की,  2012 च्या 182 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 आमदारांचे जाहीरनामा गायब आहे. यातील  49  (31 %)  आमदारांवर गुन्ह्यांची नोंद  आहेत. 21 (13%) आमदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसचे 10 % आमदार,भाजपचे 13  %  आमदार, राष्ट्रवादी- जेडी (यू) चे 50 % आमदारांवर गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

यावेळी विधानसभा निवडणुकीत 50 %  स्वच्छ प्रतिमेचे  उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या 1 वर्ष आधीच रॅली-सभाचे आयोजन होते यात होणार खर्च कोणाच्या नावे होणार याविषयीचा अर्ज उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. असेही अनिल वर्मांनी सांगितले.

पक्षानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार

पक्ष             आमदार          गंभीर गुन्हे

कॉंग्रेस         42                   6 (10%)

भाजप         112                  15(13%)

राष्ट्रवादी       2                  1 (50%)

जद (यू)         1                  1 (100%)

 

करोड़पति आमदार

पक्ष           आमदार    करोड़पति       वार्षिक उत्पन्न

कॉंग्रेस            42         55%              01

भाजप           112        73%               04

राष्ट्रवादी         2        100%               –

जीपीपी           1              –                    –

जेडी (यू)        1           100%              –

COMMENTS