अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांने अखेर काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतलायं. याबाबद हार्दिक पटेलने आज घोषणा केली. पाटीदार समाजाच्या आरक्षणासह आमच्या सर्व मागण्या काँग्रेसनं मान्य केल्याचं त्यानं स्पष्ट केलं. हार्दिकच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.
गुजरातमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता पाटीदारांना काँग्रेस आरक्षण देणार आहे. गुजरातमध्ये सरकार आल्यानंतर त्या बाबतचे विधेयक विधानसभेत आणले जाईल, अशी माहितीही हार्दिकने दिली. काँग्रेसने सुरूवातीपासून आरक्षणाबाबत चांगला प्रतिसाद दिल्याचेही त्यांने आवर्जून सांगितले. काँग्रेसने चांगले आणि प्रामाणिक उमेदवार द्यावेत, अशी आपली मागणी होती. पाटीदारांसाठी कधीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
यावेळी हार्दिकने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजप विरोधात छाती ठोकून लढणार असल्याचेही त्याने सांगितले. पाटीदारांनी विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्याने यावेळी केले. दरम्यान 29 नोव्हेंबरला हार्दिक राजकोटमध्ये जाहीर सभा घेणार आहे
COMMENTS