गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून नवा चेहरा, “या” नावांची आहे चर्चा !

गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून नवा चेहरा, “या” नावांची आहे चर्चा !

अहमदाबाद – गुजरातमध्ये भाजपने कशीबशी सत्ता मिळवल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगली आहे.  इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भाजप राज्यात नवा चेहरा देण्याची शक्यता आहे. विजय रुपाणी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता कमी आहे असंही वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडं गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असंही वृत्तामध्ये म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांनी मात्र आपण गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यातील नेतृत्वगुणांमुळे मोदी आपल्या विश्वासू सहकारी म्हणून स्मृती इराणी यांना पुढे करु शकतात अशी चर्चा आहे. स्मृती इराणी यांच्याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांचंही मुख्यमंत्रीपदासाठी नाव घेतलं जात आहे. पाटीदार समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शेतकरी वर्गातही त्यांची चांगली प्रतिमा आहे.

COMMENTS