“त्या” 8 जागांमुळे काँग्रेसचं बहुमत हुकलं, राष्ट्रवादीमुळे 3 उमेदवार पडले !

 “त्या” 8 जागांमुळे काँग्रेसचं बहुमत हुकलं, राष्ट्रवादीमुळे 3 उमेदवार पडले !

अहमदाबाद – गुजरातमध्ये भाजपने 99 जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. मात्र यावेळी भाजपला विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातच काँग्रेसने भाजपला चांगलाच फेस आणला. मात्र निसटता का होईना भाजपने विजय मिळवलाच. काल निकाल लागेल्या जागंमध्ये 12 जागा अशा आहेत. तिथे अतिशय कमी फरकाने कोणत्यातरी पक्षाचा उमेदावर विजयी झाला आहे. त्यापैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निसटत्या फरकाने पराभूत झाला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी बसपा तर काही ठिकाणी अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे. भाजपविरोधी मतांमध्ये फाटाफूट झाली नसती तर कदाचित काँग्रेसला गुजरातमध्ये बहुमत मिळालं असतं.

8 पैकी 3 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे उमेदवार हरले आहेत. धोलका मतदारसंघात भाजपचा उमेदवार केवळ 327 मतांनी जिंकला. त्या ठिकणी बसपाच्या उमेदवाराने 3 हजारांपेक्षा जास्त तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 1100 पेक्षा जास्त मते घेतली. फतेपुरा मतदारसंघात भाजपचा उमेदवार 2711 मतांनी जिंकला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2747 मते मिळाली. डांग्ज मतदारसंघात भाजपचा उमेदवार केवळ 768 मतांनी जिंकून आला आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 1304 मते मिळाली आहेत.

COMMENTS