“गुजरातमध्ये जिंकण्यासाठी काँग्रेस दहशतवाद्यांचीही मदत घेईल”

“गुजरातमध्ये जिंकण्यासाठी काँग्रेस दहशतवाद्यांचीही मदत घेईल”

गुजरातमध्ये काँग्रेसला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आणि भाजप विरोधात तयार होत असलेल्या जनमतामुळे भाजपचे नेते आता काहीही बेताल वक्तव्य करु लागले आहेत. गुजरातमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस कुठल्याही थराला जाऊ शकते याचं उदाहरण देताना गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचा तोल गेला. गुजरातमध्ये फायदा होत असेल तर काँग्रेस मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदचीही मदत घेईल असे वक्तव्य गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केलं आहे.

काँग्रेसकडून जातीय राजकारण केलं जात असल्याचा आरोपही नितीन पटेल यांनी केला. १९८० मधील खाम समीकरण (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) काँग्रेसकडून पुन्हा वापरले जात असल्याचे पटेल यांनी म्हटले. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या भेट झाल्याची चर्चा सध्या गुजरातमध्ये सुरू आहे. अर्थात हार्दिक पटेल यांनी  अशी चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी या गुजरातमधील तीन मासबेस युवा नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

COMMENTS