गुजरातमध्ये पुन्हा भाजपच, मात्र मागच्या सर्व्हेच्या तुलनेत मते मोठ्या प्रमाणात घटली, ओपिनियन पोल सर्व्हेमध्ये अंदाज !

गुजरातमध्ये पुन्हा भाजपच, मात्र मागच्या सर्व्हेच्या तुलनेत मते मोठ्या प्रमाणात घटली, ओपिनियन पोल सर्व्हेमध्ये अंदाज !

अहमदाबाद – गुजरातमध्ये काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तर सत्तेपर्यंत ते जाऊ शकणार नाहीत अशी सध्याची तरी स्थिती आहे. एबीपी न्यूज, सीएसडीएस आणि लोकनिती यांनी केलेल्या सर्व्हेनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण 182 जागांपैकी भाजपला 113 ते 121 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 58 ते 64 तर अपक्ष आणि इतरांना 1 ते 7 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मतांच्या टक्केवारीचा विचार करता भाजपला भाजपला 47 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. गेल्या विधानसभ निवडणुकीत भाजपला 48 टक्के तर काँग्रेसला 39 टक्के मते मिळाली होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 60 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसल केवळ 33 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं. 2014 च्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाल्याचं दिसून येतंय तर काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं दिसून येतंय.

यापूर्वी डिसेंबर 2016 च्या मतांच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये चांगलीच घट झाली आहे. दक्षिण गुजरातमधील ३५ जागांवर भाजपला ५१ टक्के तर काँग्रेसला ३३ टक्के मते मिळण्याची शक्यता. यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये भाजपला या ठिकाणी ५४ टक्के तर भाजपला २७ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मध्य गुजरातच्या ४० जागांवर भाजपला ५४ टक्के तर काँग्रेसला ३८ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सर्व्हेच्या तुलनते भाजपला २ टक्क्यांचे नुकसान तर काँग्रेसच्या मतांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर गुजरातमधील ५३ मतदारसंघांमध्ये भाजपला ४४ टक्के तर काँग्रेसला ४९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सर्व्हेच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये १५ टक्क्यांची घट तर काँग्रेसच्या मतामध्ये १६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र-कच्छमधील ५४ जागांवर भाजपला ४४ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याची शक्यता. डिसेंबर २०१६ च्या सर्व्हेत भाजपला या ठिकाणी ६५ तर काँग्रेसला २६ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

 

COMMENTS