मुंबई – जळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला होता. यावेळी महाजनांनी स्वतः बंदूक घेऊन या शोधमोहिमेत सहभागी झाले. यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. तसंच महाजन यांनी वन कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही नवाब मलिक यांनी केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याने गेल्या दोन महिन्यात सहा लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांना जीव मुठीत घेवून वावराव लागत आहे. सरकारने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गिरीष महाजन हे सुरक्षेची कोणतीही तयारी न करता करत असलेल्या दबंगगिरीमुळे ते वन कायद्याचा भंग करत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
Minister #GirishMahajan has violated the Wildlife Protection Act, a case should be registered against him & he should be expelled immediately. @PTI_News @ANI @PetaIndia pic.twitter.com/pFhMjRl20h
— Nawab Malik (@nawabmalikncp) November 28, 2017
COMMENTS