गुजरातमध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेस – राष्ट्रवादीचा काडीमोड, राष्ट्रवादी स्वबळावर 65 जागा लढवणार !

गुजरातमध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेस – राष्ट्रवादीचा काडीमोड, राष्ट्रवादी स्वबळावर 65 जागा लढवणार !

अहमदाबाद – होय, नाही, होय, नाही करत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अगदी शेवटच्या क्षणी काडीमोड झालाय. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर 65 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गुजरातमध्ये फारसा बेस नाही. मात्र त्यांचे काही उमेदवार तगडे आहेत. त्याचा फटका काँग्रेला बसण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपच्या उमेदवाराला उघडपणे मदत केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षात अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. आघाडीची बोलणी पहिल्या टप्प्यात होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासल्ल्यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीसाठी चर्चा केली. मात्र त्यामध्ये तोडगा निघू शकला नाही.

2007 आणि 2012 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. दोन्ही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने 9 जागा लढवल्या होत्या. त्यात 2007 मध्ये 3 तर 2012 मध्ये दोन जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रावादी काँग्रसने यावेळी जास्त जागांची मागणी सुरूवातीला केली होती. मात्र पवाराच्या सुचनेनंतर त्यांनी 9 जागांची मागणी केली. मात्र काँग्रसने तेवढ्याही जागा देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रादी काँग्रसने आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS