सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज सांगली जिल्ह्यात आहे. तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा उल्लेख करत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नीला भाजप खासदाराच्या गुंडगिरीविरोधात उपोषण करावे लागत असेल तर या राज्यात सामान्य माणसाची काय स्थिती असेल असा सवाल अजित पवार यांनी केला.
याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश शेंडगे यांचंही भाषण झालं. त्यांनीही धनगर आरक्षणावरुन सरकारवर टीका केली. धनगर समाजाला फसवण्याचे काम या सरकारने केले. आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बारामतीला उपोषण केले होते. फक्त लिंबू सरबतावर समाधान मानावे लागले. अजितदादांनी आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातून पळवून लावू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.
https://twitter.com/NCPspeaks/status/981497256976072705
या दुष्काळी भागात चौथी पिढी पाण्याची वाट पाहत आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाले तेव्हा अनेक आश्वासन दिली गेली. पण हा भाग अजूनही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. स्थानिक आमदारांनी काहीच हालचाल केली नाही. या सरकारला आता ऑफलाईन करण्याची वेळ आली आहे असंही शेंडगे म्हणाले.
COMMENTS